Shekhar Suman: 'त्यांच्यामुळे समाज सुरक्षित राहतो...'; सेक्स वर्कर्सबद्दल बोलले शेखर सुमन

Shekhar Suman: शेखर सुमन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत हिरामंडीबद्दल तसेच सेक्स वर्कर्स आणि तवायफ यांच्यात असणारा फरक याबद्दल सांगितलं.
Shekhar Suman
Shekhar Sumansakal

Shekhar Suman: गेल्या काही दिवसांपासून नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या हिरामंडी या वेब सीरिजची चर्चा होत आहे. ही वेब सीरिज रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या वेब सीरिजमधील कलाकारांचे, गाण्यांचे, डायलॉग्सचे कौतुक केले. 'हिरामंडी' (Heeramandi) वेब सीरिजमध्ये तवायफांनी (गणिका) स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान दाखवण्यात आलं आहे. या वेब सीरिजमध्ये  जुल्फिकार नावाची भूमिका साकारणाऱ्या शेखर सुमन (Shekhar Suman) यांचेही अनेकांनी कौतुक केलं. अशातच शेखर सुमन यांनी नुकत्याच एका मुलाखतीत हिरामंडीबद्दल तसेच सेक्स वर्कर्स आणि तवायफ यांच्यात असणारा फरक याबद्दल सांगितलं.

सेक्स वर्करबद्दल काय म्हणाले शेअर सुमन?

शेअर सुमन यांनी मुलाखतीत सांगितलं, "तवायफांना अनेकवेळा समाजात वेगळ्या नजरेनं बघितलं जातं. त्यांच्यावर अनेकवेळा सेक्स वर्करचे लेबल लावले जाते. पण या दोघांमध्ये फरक आहे. हिरामंडी या वेब सीरिजमध्ये असे स्पष्ट केले गेले आहे की, कोणतीही स्त्री तिच्या इच्छेने सेक्स वर्कर होत नाही. परिस्थिती अनेकदा स्त्रीला सेक्स वर्कर होण्यास भाग पाडते. हे सर्व असूनही समाजासाठी त्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्यामुळे समाज सुरक्षित आहे. कारण कारण पुरुषांना त्यांची लैंगिक भूक सेक्स वर्कर्सच्या माध्यमातून भागवायला मिळते."

शेअर सुमन यांनी पुढे सांगितले की,"शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिष्टाचार, प्रेम, कला, कविता, संगीत आणि नृत्य शिकण्यासाठी लोकांना हिरामंडी येथे पाठवले जात होते."

"हिरामंडीचे योगदान खूप मोठे होते, ती एक संस्था होती, परंतु आपण तवायफ (गणिका) स्त्रियांकडे नेहमीच वेगळ्या नजरेनं पाहिले आहे. तवायफ असण्यात काही गैर नाही.हिरामंडीमध्ये त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदानही दाखवण्यात आले, जे लक्षणीय होते.", असंही शेअर सुमन यांनी सांगितलं.

Shekhar Suman
Heeramandi The Diamond Bazar : ना सोनाक्षी ना मनीषा, 'या' व्यक्तीनं घेतलं सर्वाधिक मानधन; 'हिरामंडी' बजेट किती? जाणून घ्या

नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या हिरामंडी या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, अदिती राव हैदरी, शर्मीन सेगल मेहता, फरीदा जलाल, फरदीन खान आणि अध्यायन सुमन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Shekhar Suman
Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com