मराठी अभिनेत्रीचा बॉलिवूडमध्ये डंका, IMDbवर ठरली नं १, दीपिका पादुकोणलाही टाकलं मागे, ही आहे तरी कोण?

IMDB Most Popular Indian Celebrity: या मराठी अभिनेत्रीने आता आयएमडीबीवर आपलं स्थान निर्माण केलं आहे.
Imdb most Popular indian celebrity
Imdb most Popular indian celebrity sakal

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या करिअरच्या शिखरावर आहे. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट आणि दुसरीकडे आई होण्याचा आनंद यामुळे ती चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. 'जवान', 'पठाण', 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटांमध्ये दीपिका मुख्य भूमिकेत दिसली. फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगभरात तिचे चाहते आहेत. ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. यापूर्वी ती आयएमडीबीच्या सर्वाधिक लोकप्रिय भारतीय अभिनेत्रीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होती. मात्र आता तिच्या या स्थानाला धक्का लावणारी अभिनेत्री समोर आली आहे. ही अभिनेत्री आहे मराठमोळी शर्वरी वाघ.

थेट दीपिकाला धोबीपछाड

माजी मुख्यमंत्र्यांची नात म्हणून शर्वरीची एक वेगळी असली तरी तिने तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. यापूर्वी शर्वरी अनेक चित्रपटात झळकली. मात्र आता तिच्या करिअरच्या गाडीने वेग पकडला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ती नुकतीच 'मुंज्या' चित्रपटात झळकली होती. तिच्या अभिनयाची बरीच चर्चा झाली. त्यानंतर ती आमिर खानचा मुलगा जुनैद खान याच्या 'महाराजा' या चित्रपटात झळकली. ती या चित्रपटात फार कमी काळासाठी दिसली असली तरी तिच्या या चित्रपटातील भूमिकेचं देखील चांगलंच कौतुक होतंय. आता तर तिने थेट दीपिकाला धोबीपछाड केलं आहे. शर्वरी आयएमडीबी च्या सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

याबद्दल शर्वरीने तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. याबद्दल बोलताना शर्वरी म्हणाली, 'हे वर्ष माझ्यासाठी कसं गेलं हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आता १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या 'मुंज्या'साठी आणि 'महाराज' चित्रपटातील माझ्या विशेष भूमिकेबद्दल मला मिळालेल्या सर्व प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. मी आणखी मेहनत करतेय जेणेकरून मी खूप चांगल्या चित्रपटांचा भाग होऊ शकेन. माझं डोकं आणि मन दोन्ही या एकाच ध्येयाच्या दिशेने धावत आहे.'

Imdb most Popular indian celebrity
Aashadhi Wari 2024: बॅनरवर खर्च पण पायाखाली वावर शीने भरलेले, बायकांना तर... वारीतील अस्वच्छतेवर अभिनेत्रीची परखड पोस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com