बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या तिच्या गाण्यामुळे चर्चेत आली आहे. 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'बेसोस' या म्युझिक व्हिडिओमुळे तिची प्रचंड चर्चा होताना दिसतेय. या गाण्यात तिचा जबरदस्त अंदाज पहायला मिळाला आहे. दरवेळीप्रमाणे या गाण्यातही तिने भन्नाट डान्स केला आहे. परंतु यावेळी गाण्याची चर्चा फक्त जॅकलिनमुळे नाहीतर एका खास व्यक्तीमुळे सुद्धा झाली आहे. कारण क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शिखर धवनने डायरेक्ट बॉलिवूडच्या गाण्यात एन्ट्री घेतलीय.