Shilpa RaoEsakal
Premier
पाकिस्तानमध्ये गाणं गाणाऱ्या अखेरच्या भारतीय गायिकेचा बॉलिवूडवर आरोप ; "महिला गायिकांना मानधन.."
Shilpa Rao spill bean about bollywood discrimination about payment : गायिका शिल्पा रावने बॉलिवूडमधील मानधनाबाबत नाराजी व्यक्त केली.
Bollywood Entertainment News : प्रसिद्ध गायिका शिल्पा रावने संगीत क्षेत्रातील स्त्री -पुरुष गायकांच्या मानधनामध्ये असणारा भेदभाव आणि त्यात समानता आणण्याबद्दल तिचं असलेलं मत तिने व्यक्त केलं. नुकतंच शिल्पाने एका पॉडकास्टमध्ये हजेरी लावली यावेळी तिने बॉलिवूडमधील तिला खटकणाऱ्या गोष्टींबाबत खंत व्यक्त केली.
शुभंकर मिश्रासोबतच्या पॉडकास्टमध्ये शिल्पाने सांगितले की, पगार कामाच्या आधारावर दिला जातो, लिंगाच्या आधारावर नाही. जेव्हा शिल्पाला विचारण्यात आले की महिला गायकांना पुरुष गायकांच्या तुलनेत कमी पैसे मिळतात का? या प्रश्नाच्या उत्तरात शिल्पा म्हणाली, 'पैसा नेहमीच तुमच्या कामानुसार असतो, तुम्ही पुरुष गायक असाल तर तुम्हाला जास्त मानधन मिळेल, असे कधीच होत नाही.'

