
Why Shilpa Shetty Is Not Celebrating Ganesh Festival This Year: गणेशोत्सव अवघा एका दिवसावर आला आहे. सर्वजण लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत आहे. घराघरात गणरायाचे अगदी उत्साहात थाटामाटात आगमन होणार आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटीपर्यंत प्रत्येकाकडे त्यांचा लाडका बाप्पा येणार आहे. मात्र अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या घरी यंदा बाप्पाचे आगमन होणार नसल्याची बातमी समोर आली आहे.
खरंतर शिल्पा शेट्टीच्या घरी अगदी धुमधडाक्यात दरवर्षी गणरायाचे आगमन होत असते. तिच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील येत असतात. ढोल ताशांच्या तालावर शिल्पा शेट्टी बाप्पासमोर स्वत: ठेका धरत असते. परंतु यंदा हे चित्र दिसणार नाही.
शिल्पा शेट्टीने स्वत: याबाबत सर्वांना माहिती दिली आहे. यामुळे शिल्पा शेट्टीच्या घरी गणेशोत्सवाची २२ वर्षांची परंपरा खंडीत होणार आहे. पण नेमकं कशामुळे शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणरायाचे आगमन होणार नाही, हे आपण जाणून घेऊयात.
शिल्पा शेट्टीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे कुटुंब १३ दिवसांचा दुखवटा पाळत आहे आणि या काळात ते धार्मिक कार्यक्रमापासून दूर राहणार आहेत. शिल्पाने एका भावनिक पोस्टद्वारे याबाबत सांगितले आहे. शिल्पा शेट्टीच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्याने, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.
शिल्पा शेट्टीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजद्वारे भावनिक नोटसह ही माहिती दिली. ज्यामध्ये शिल्पा म्हणाली, 'प्रिय मित्रांनो, कुटुंबातील एका व्यक्तीच्या निधनामुळे आम्ही या वर्षी २०२५ मध्ये गणपती उत्सव आयोजित करू शकणार नाही हे अत्यंत दुःखाने कळवत आहोत.'
तिने पुढे म्हटले आहे की परंपरेनुसार, कुटुंब १३ दिवस शोक करेल आणि म्हणूनच कोणत्याही धार्मिक उत्सवापासून दूर राहील. आम्हाला तुमच्या संवेदना आणि प्रार्थनांची अपेक्षा आहे. कृतज्ञतेसह - कुंद्रा कुटुंब.' आणि या पोस्टच्या शेवटी शिल्पाने लिहिले आहे, 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या'..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.