अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने सर्वांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. तसंच सर्वांना काळजी घेण्याचाही सल्ला शिल्पाने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दिला आहे.