

Marathi Entertainment News : सध्या हिंदी टेलिव्हिजनवरील मालिकांप्रमाणे मराठी मालिकांमध्ये दोन मालिकांचा महासंगम करण्याचा ट्रेंड सुरु झालाय. पारू आणि सावळ्याची जणू सावली या मालिकेपाठोपाठ आता झी मराठीवरील शिवा आणि लाखात एक आमचा दादा या दोन मालिकांचा महासंगम पाहायला मिळणार आहे. शिवा आणि सूर्या लहानपणीचे मित्र असल्याचं उघड होणार आहे.