गेल्या काही दिवसांपासून 'CID 2' मधून शिवाजी साटम यांची 'एक्झिट' होणार अशा चर्चा रंगत होत्या. परंतु आता त्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. एसीपी प्रद्युम्न पुन्हा CID 2 मालिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. सोनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला होता. त्यामध्ये त्यांनी एसीपी प्रद्युम्न यांचा मृत्यू झाल्याचं दाखवलं होतं.