
दशावतार हा चित्रपट कोकणावर आधारित असला तरी त्यातील वेदना व वास्तव संपूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतात.
दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी एक परिपूर्ण आणि प्रभावी चित्रपट मराठीला दिला असून दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय विशेष कौतुकास्पद ठरला आहे.
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी आयोजित विशेष शोमध्ये उद्धवजींसह अनेक मान्यवर उपस्थित होते आणि सर्वांनी या चित्रपटाचं कौतुक केलं.