
Latest Bollywood News : शोले हा सत्तरच्या दशकात रिलीज झालेला सिनेमा आजही जनमानसात लोकप्रिय आहे. या सिनेमाचे संवाद,यातील पात्र आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. या सिनेमात काम करणारे काही दिग्गज कलाकार आज या जगात नाहीयेत पण आजही त्यातील एक लक्षात राहिलेलं पात्र म्हणजे डाकू गब्बर सिंहचं. नजरेने आणि आवाजानेच जरब बसवणारं हे पात्र साकारलं अभिनेते अमजद खान यांनी. गब्बर सिंहची क्रूरता, हिंसक वृत्ती त्यांनी पडद्यावर उत्तम साकारली. पण तुम्हाला माहितीये का ? शोलेमधील गब्बर सिंह हा एका खऱ्या डाकूवरून प्रेरित होता.