Shraddha Arya Comeback : आई झाल्यानंतर 5 महिन्यातच श्रद्धा आर्या कमबॅक करणार, 'कुंडली भाग्य' नाहीतर 'या' मालिकेत असणार महत्त्वाची भूमिका
TV Actress Comeback: अभिनेत्री श्रद्धा आर्या लवकरच कमबॅक करणार आहे. बाळांच्या जन्मानंतर 5 महिन्यातच श्रद्धा एका नव्या मालिकेमध्ये चाहत्यांना पहायला मिळणार आहे.
मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा आर्या लवकरच कमबॅक करणार आहे. प्रेग्नेसीमुळे तिने 'कुंडली भाग्य' मालिका सोडली होती. मालिकेत ती प्रीता ही मुख्य भूमिका साकारत होती. परंतु यावेळी ती प्रीताच्या नाहीतर वेगळ्या भूमिकेत चाहत्यांना दिसणार आहे.