Shraddha Kapoor Shares Funny Video Viral
esakal
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अभिनयाच्या लाखो चाहते आहेत. तसंच तिचा साधेपणा, बोलण्याची पद्धत आणि डाऊन टू अर्थ स्वभाव यामुळे चाहत्यांना ती प्रचंड आवडते. श्रद्धा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमीच ती तिचे दैनदिन अपडेट चाहत्यांना देत असते. अशातच आता तिने एक मजेशीर व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केलाय. तो व्हिडिओ तिच्या कथित बॉयफ्रेंड राहूलनेच शूट केलाय.