SHRADDHA KAPOOR VISITS AMBABAI TEMPLE
esakal
SHRADDHA KAPOOR MARATHI LOOK WINS FANS HEARTS: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या चर्चेत आहे. तिचा लवकरच ईठा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती तिच्या 'ईठा'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. अशातच आता ती कोल्हापुरात पोहचली होती. यावेळी श्रद्धाने महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या आई अंबाबाईचं दर्शन घेतलं. तिचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड भावला आहे. तसंच यावेळी श्रद्धाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मंदिरातील फोटो सुद्धा शेअर केलेत. यावेळी तिने 'आई अंबाबाई, आपके दर्शन के लिए, thank you... Kolhapur' असं कॅप्शन सुद्धा दिलय.