Shraddha Kapoor Viral Video : मराठमोळा पाहुणचार... श्रद्धाने इन्स्टाग्रामच्या CEOला खाऊ घातली पुरणपोळी... सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Shraddha Kapoor Puranpoli Viral Video: श्रद्धा कपूर ही नेहमीच तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. अशातच तिने इन्स्टाग्रामचे CEO अॅडम मोसेरी यांना पुरणपोळी खाऊ घातली. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
Shraddha Kapoor feeds puranpoli to Instagram CEO Adam Mosseri
Shraddha Kapoor feeds puranpoli to Instagram CEO Adam Mosseriesakal
Updated on

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तीने तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. दरम्यान अभिनयाबरोबरच श्रद्धा कपूर तिच्या साधेपणामुळे चाहत्यांच्या मनात घर करुन आहे. तिचा साधेपणा नेहमीच तिच्या वागण्यातून बोलण्यातून चाहत्यांना पहायला मिळतो. तसंच श्रद्धा नेहमीच मराठी संस्कृतीचं, विचारांचं पालन करताना दिसत असते. अशातच तिने इन्स्टाग्रामचे CEO अ‍ॅडम मोसेरी यांच्यासाठी खास पुरणपोळी बनवून आणली. सध्या तिचा अ‍ॅडम मोसेरी यांना पुरळपोळी खाऊ घालतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com