
Bollywood News : बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची ओळख निर्माण करणारा अभिनेता श्रेयस तळपदे याच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा काल दाखल करण्यात आला. या बातमीमुळे अनेक चर्चा सिनेविश्वात रंगल्या होत्या. उत्तर प्रदेशमधील ग्रामस्थांना गुंतवणुकीवर पैसे दामदुप्पट करून देण्याची योजना सांगण्यात आली होती पण नंतर पैसे घेऊन कंपनीचे एजंट पसार झाल्याची तक्रार गावकऱ्यांनी दाखल केली.