मराठीसह हिंदी कलाविश्वास आपली एक वेगळी छाप पाडणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतच सिद्धार्थच्या अभिनयाला 25 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने त्याने आई-वडिलांसाठी एक खास काम केलं आहे. 26 जानेवारी 2001 मध्ये सिद्धार्थने 'तुमचा मुलगा काय करतो?' या नाटकातून रंगभूमीमध्ये पदार्पण केलं होतं. आपल्या अभिनयाच्या जोरावर तो सर्वांचा लाडका सिद्धू झाला.