

मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव याने सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्याचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग आहे. प्रत्येक चित्रपटात सिद्धार्थ स्वतःचा ठसा उमटवण्यात यशस्वी ठरलाय. मात्र गेले काही वर्ष सिद्धार्थचं वैयक्तिक आयुष्य मात्र आलबेल नसल्याचं दिसलं. त्याच्यात आणि पत्नी तृप्ती अक्कलवार यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं दिसत होतं. तृप्तीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या नावातून तिचं सासरचं आडनाव हटवलं होतं. आता तिने त्यामागचं कारण सांगितलं आहे.