Seema Chandekar and Mitali MayekarEsakal
Premier
"लग्नाच्या निर्णयाला सुनेने दिला पाठींबा" ; सिद्धार्थच्या आईने केलं मितालीचं भरभरून कौतुक
Sidharth's mother praised Mitali Mayekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या आईने त्यांची सून मिताली मयेकरने लग्नाच्या निर्णयाबाबत दिलेल्या पाठींब्याबाबत सांगितलं. काय म्हणाली ती जाणून घेऊया.
Marathi Entertainment News : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर हे सोशल मीडियावर प्रसिद्ध कपल आहे . या जोडीला सगळ्यांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. फक्त सिनेविश्वातच नाही तर वैयक्तिक आयुष्यातील त्या दोघांचे काही निर्णय सगळ्यांना खूप आवडले. सिद्धार्थने त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्नाला दिलेला पाठींबा याचं अनेकांनी कौतुक केलं. यावेळी सिद्धार्थची आई सीमा यांचं वय 57 वर्षं होतं. या वयात त्यांनी घेतलेला लग्नाचा निर्णय आणि मुलांनी दिलेला पाठींबा याबाबत त्या भरभरून बोलल्याचं पण याहून जास्त त्यांनी त्यांची सून मितालीचं खूप कौतुक केलं.