झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'जमाई नं.1' प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली आहे. सध्या ही मालिका एका भावनिक वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील एका सीनमध्ये अभिनेत्री सिमरन कौरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एका वन-टेक इमोशनल सीनमध्ये ती अक्षरशः रडू लागली आणि संपूर्ण युनिटने तिच्या अभिनयाचं कौतूक केलं.