
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अभिजात भट्टाचार्य त्यांच्या गाण्यांबरोबर वादग्रस्त विधानांसाठीही ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या टिपण्णीमुळे चर्चेत आले होते. महात्मा गांधींना त्यांनी पाकिस्तानचा राष्ट्रपिता म्हटलं होतं. या विधानावरून त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.