
Bollywood Latest News : गेल्या काही दिवसांपासून उदित नारायण यांचा एका मुलीला कॉन्सर्ट दरम्यान किस करतानाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिला चाहतीच्या ओठांवर किस करणाऱ्या उदित नारायण यांच्यावर अनेकांनी टीका केलीये तर चाहत्यांनाही धक्का बसला आहे. उदित यांनी स्वतःच्या कृतीच समर्थन केलं असलं तरीही अनेकांचा राग शांत झाला नाहीये. त्यातच आता गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी उदित यांच्या समर्थनार्थ वादग्रस्त विधान केलं.