
Bollywood News : बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अमाल मलिकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या आई-वडील आणि इतर कुटूंबियांबरोबर संबंध तोडत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या कुटूंबामुळेच तो सध्या डिप्रेशनचा सामना करत असल्याचा खुलासा केला तर त्याच्यात आणि त्याच्या भावामध्येही दुरावा आल्याचं तो म्हणाला. पण या पोस्ट नंतर काही तासातच दुसरी पोस्ट करत त्याने पलटी मारली. त्याच्यात आणि भाऊ अरमान मलिकमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं तो म्हणाला.