Savaniee Ravindrra: 'मत न देताच परत यावे लागले' सावनी रवींद्रचा संताप, मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना भेटूनही...

Singer Savani Ravindra Share post about voting: "मत न देताच परत यावे लागले, हे अत्यंत खेदजनक आहे", असं सावनीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.
 सावनी रवींद्रचा संताप, मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना भेटूनही...
Savani Ravindra sakal

Savani Ravindra Fb post: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. विविध कलाकार देखील त्यांचा मतादानाचा हक्क बजावत आहेत. अशातच प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्रनं (Savani Ravindra) नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सावनीनं मतदार यादीत तिचं नाव नसल्यानं संताप व्यक्त केला आहे. "मत न देताच परत यावे लागले, हे अत्यंत खेदजनक आहे", असं सावनीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सावनी रवींद्रची पोस्ट

सावनी रवींद्रनं फेसबुकवर दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यापैकी एका फोटोमध्ये सावनी ही वेटींग बूधवर उभी असलेली दिसत आहे तर दुसरा फोटो सावनीनं तिच्या बोटाचा शेअर केला आहे. या फोटोमध्ये सावनीच्या बोटाला शाई लावलेली दिसत नाहीये. या दोन्ही फोटोंना सावनीनं कॅप्शन दिलं, "गेले अनेक दिवस सर्व online पोर्टल वर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज voting booth ला जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही. ( ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे त्याच ठिकाणी)."

"आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत पण माझे नाही. या बद्दल स्वतः वोटिंग officer ची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन AED पर्यायाने वोट करू शकते का याबद्दल विचारणा केली, त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले- अत्यंत खेदजनक", असंही सावनीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे.

अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळ्यात आली आहेत. याचा फटका गायिका सावनी रवींद्रला देखील बसला."गेल्या तीन दिवसांपासून मी आपले नाव मतदारयादीत शोधत होते.विविध ऑनलाइन पोर्टलवर अनेकदा प्रयत्न करूनहीनाव सापडले नाही. त्यामुळे थेट माटे प्रशाला येथील मतदान केंद्रावर जायचा निर्णय घेतला. तिथे माझ्या पूर्ण कुटुंबाचे नाव होते. मात्र फक्त माझेच नाव यादीतून वगळ्यात आले होते.", असे गायिका सावनी रवींद्र यांनी ‘सकाळ’ सोबत बोलताना सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावरही तिने केलेली पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमध्ये त्यांनी मतदान केंद्रावरील सेल्फी व शाई न लावलेल्या बोटाचा फोटो टाकून आपल्याला मतदान न करता आल्याची खंत व्यक्त केली आहे.

सावनीप्रमाणेच अभिनेता सुयश टिळकला देखील यावेळी मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. याबाबत सुयशनं देखील पोस्ट शेअर करुन खंत व्यक्त केली आहे.

सुबोध भावे, अमोल पालेकर, मोहन आगाशे या कलाकारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे.

 सावनी रवींद्रचा संताप, मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना भेटूनही...
Lok Sabha Elections 2024: "मला त्यात शून्य इंटरेस्ट, पण कोणाला मत द्यायचं हे..."; राजकारणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला सुबोध भावेचं उत्तर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com