Remembering Smita Patil: The Actress Who Spoke Through Her Eyes:
esakal
पडद्यावर फार न बोलता डोळ्यांनीच अनेक गोष्टी पोहोचवणाऱ्या अभिनेत्रींपैकी महत्त्वाचे नाव- स्मिता पाटील. १९७४ मध्ये त्यांच्या अभिनयाचा श्रीगणेशा झाला आणि १९८६ मध्ये वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी त्यांचे निधन झाले. इतक्या लहान वयात कुणाचे असे का व्हावे, म्हणून हळहळणाऱ्या रसिकांना झालेली पुढची जाणीव ही होती, की आता ती बोलक्या डोळ्यांची, सर्वसामान्यांना आपल्यातलीच वाटणारी स्मिता चित्रपटांत कधीच दिसणार नाही!