बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील हिचा मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. परंतु वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. अभिनयाबरोबरच वयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा ती खूप चर्चेत होती. परंतु राज बब्बर यांच्यासोबत लग्न केल्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. तिच्या लग्नाला आईचा प्रचंड विरोध होता.