

Popular Singer From Kokan Get Married
esakal
Entertainment News : सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेली गायिका आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर स्वानंदी सरदेसाईने गुपचूप लग्नगाठ बांधली. कोकणातील परंपरा, तिथलं राहणीमान, दैनंदिन जीवन स्वानंदी तिच्या व्हिडिओमधून लोकांसोबत शेअर करते. याबरोबरच शास्त्रीय गायिका म्हणूनही ती प्रसिद्ध झाली आहे. स्वानंदीने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गुपचूप लग्न उरकलं.