DIVYA SHINDE ENTERS BIGG BOSS MARATHI 6 HOUSE
esakal
BIGG BOSS MARATHI 6: मराठी मनोरंजनविश्वात चर्चेत असलेला रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये घरातील पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता वाढताना पहायला मिळतेय. यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दिव्या शिंदे, जी सोशल मीडियावर ‘सरकार’ या नावाने प्रसिद्ध आहेत, तिने बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री केली आहे. ती सिंहगड कॉलेजविरोधात केलेल्या आंदोलनांमध्ये चर्चेत आली होती.