

pooja birari and soham bandekar wedding
esakal
'दार उघड बये दार उघड' असं म्हणत प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते आदेश बांदेकर संपूर्ण महाराष्ट्राचे भावोजी आहेत. मात्र सध्या संपूर्ण बांदेकर कुटुंब प्रचंड व्यग्र आहे. कारण उद्या २ डिसेंबर रोजी आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न आहे. सोहम बांदेकर हा लोकप्रिय मराठी अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच पूजा आणि सोहम यांचा हळदी समारंभ पार पडला. या समारंभाचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतायत. या सोहळ्याला सगळ्यांनी दणकून मजा केलीये हे या फोटोंमध्ये स्पष्ट दिसतंय.