

SOHAM AND POOJA BIRARI WEDDING
ESAKAL
'वेड लागलं प्रेमाचं' मालिकेतून घराघरात पोहोचलेली छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेते आदेश बांदेकर व अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या लग्नाची चाहते वाट पाहत होते. आता अखेर ते दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या आहेत. सोहम आणि पूजाच्या लग्नाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. वर वधूचे लूकदेखील सोशल मीडियावर व्हायरल झालेत. मात्र पूजाच्या लूकवर चाहते नाराज असल्याचं दिसतंय.