

SOHAM AND POOJA WEDDING
ESAKAL
मराठमोळ्या अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि संपूर्ण महाराष्ट्राचे भावोजी असलेले आदेश बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर आज २ डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. तो मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहे. पूजाच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. सोबतच सोहम आणि पूजाच्या हळदीचे आणि संगीतचे फोटोही प्रेक्षकांना प्रचंड आवडले. सोमवारी त्यांचा हळदी समारंभ अगदी दणक्यात साजरा झाला. त्यांच्या हळदी समारंभाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र हे लग्न कुठे आहे तुम्हाला ठाऊक आहे का?