
soham bandekar
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी आणि आदेश- सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा अभिनेता सोहम बांदेकर यांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर लवकरच सासरेबुवा होणार आहेत. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जातंय. तो पूजाला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र आता त्यांच्यातील प्रेम खुल्लमखुल्ला प्रेक्षकांना दिसू लागलंय. सोहमच्या एका कमेंटची सध्या जोरदार चर्चा आहे.