
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर चर्चेत असते. तिचे फोटो कायम चाहत्यांमध्ये व्हायरल होत असतात. मात्र आता सोनाक्षी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेते मुकेश खन्ना यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीबद्दलच्या त्या घटनेची पुन्हा आठवण करून दिली जेव्हा अभिनेत्रीला केबीसीमध्ये रामायणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता आणि तिला त्याचं उत्तर आलं नव्हतं. मात्र यावेळेस त्यांनी तिच्या वडिलांनी दिलेल्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यामुळे ती चांगलीच संतापलीये.