मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोनाली नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. रोजच्या जीवनातील घडामोडींची ती चाहत्यांना नेहमीच अपडेट देत असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का? सोनाली कुलकर्णी अभिनय क्षेत्रास येण्यापूर्वी पत्रकार होती. परंतु लहापणापासूनच अभिनयाची आवड असल्याने तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.