actress sonali kulkarni and actress mrunmayee deshpande
actress sonali kulkarni and actress mrunmayee deshpandesakal

Sonali and Mrunmayee : सोनाली-मृण्मयी दिसणार ‘या’ नव्या सिनेमात

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ओळखली जाते ते तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी. प्रत्येक सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करणारी सोनाली आता एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ओळखली जाते ते तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी. प्रत्येक सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न करणारी सोनाली आता एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. ‘रावसाहेब’ असं तिच्या या आगामी सिनेमाचं नाव असून नुकतंच सिनेमाच्या टीमने या सिनेमाचं डबिंग पूर्ण केलं. सोशल मीडियावर सोनालीने या सिनेमाच्या डबिंगचे फोटोज शेअर केले.

सोनालीचा लवकरच रावसाहेब हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून नुकतंच या सिनेमाचं डबिंग पूर्ण झालं. दिग्दर्शक निखिल महाजनने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडेसुद्धा या सिनेमात काम करतेय. सोशल मीडियावर सोनालीने डबिंग संपल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनचे फोटोज शेअर करताना दिसतेय.

यातील एका फोटोमध्ये ती निखिलला लाथ दाखवताना दिसतेय तर एका फोटोत तिने मृण्मयीसोबत पोझ दिलीये. या फोटोजना कॅप्शन देताना ती म्हणाली,”त्याने आम्हाला त्रास दिला म्हणून नाही पण त्याने Kickass फिल्म बनवली म्हणून. रावसाहेब सिनेमाचं चित्रीकरण आम्ही पूर्ण केलं आहे आणि लवकरच आम्ही तुम्हाला सिनेमागृहात भेटू!!”

सोनालीच्या या फोटोजवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या तर मृण्मयी सोनालीवर चिडली. “पिक्चर क्रेडिट द्यायची काही पद्धत?” असा जाब तिने सोनालीला विचारला त्यावर निखिलने सुद्धा कमेंट करत मृण्मयीची बाजू घेतली. “तुझं बरोबर आहे. मलाही सोनालीचं हे वागणं बिलकुल नाही आवडलं.” असा रिप्लाय त्याने दिला. त्यांची ही नोकझोक नेटकऱ्यांना आवडली असून यावर आता सोनाली काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं आहे.

रावसाहेब हा सिनेमा नक्की कशावर आधारित आहे? या सिनेमात अजून कोण कलाकार असणार हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, सोनालीचा लवकरच मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही कारणास्तव या सिनेमाचं प्रदर्शन पुन्हा एकदा पुढे ढकललं गेलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com