बॉलीवूड अभिनेता सोनू सूदचा 'फतेह' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 10 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहात हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नसीरुद्दी शाह आणि विजय राज सारख्या मोठ्या कलाकारांचा अभिनय आहे. आता या चित्रपटासंदर्भात सोनू सुदने मोठा निर्णय घेतला आहे. चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी 99 रुपयात चित्रपट पाहता येणार आहे, तर चित्रपटाचा पुर्ण नफा दान केला जाणार आहे.