नकारात्मक भुमिका निभावणारा प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद खऱ्या आयुष्यात मात्र लोकांसाठी एक आदर्श आहे. दरम्यान सोनू सूदचा अॅक्शन चित्रपट फतेह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला असून यात अॅक्शन रोमान्स आणि धमाकेदार सीन्स या ट्रेलरमध्ये पहायला मिळणार आहेत. या दुसऱ्या ट्रेलरमध्ये सोनू सूदचा एक वेगळा दमदार अभिनय दिसून येतो.