Premier
वडील सुपरस्टार तरीही अभिनयाची वाट न निवडता मुलगा बनला आयएएस अधिकारी; बाबांकडून घेतली नाही मदत
Success Story Of IAS Srutanjay Narayanan : वडील दाक्षिणात्य सिनेविश्वातील सुपरस्टार असूनही आयएएस अधिकारी श्रुतंजय नारायणन यांनी अभिनयाचा मार्ग न स्वीकारता सरकारी नोकरीचा मार्ग स्वीकारला. जाणून घेऊया त्यांचा प्रवास.
News : नेपोटिजम हा शब्द आता बॉलिवूडमुळे सामान्य झाला आहे. फक्त बॉलिवूडच नाही तर इतर सिनेइंडस्ट्रीमध्येही अनेक कलाकारांनी आई-वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रातच काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पण अशी उदाहरणं फार कमी आहेत जिथे आई-वडील कलाकार असतानाही वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचं धाडस मुलांनी केलं आहे. अशाच एका दिग्गज अभिनेत्याच्या अभिनयात रस असूनही वेगळं करिअर निवडण्याला प्राधान्य दिल.

