
Bollywood Entertainment News : दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी एकेकाळी बॉलिवूडवर राज्य केलं. त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिलं. मिथुन चक्रवर्ती यांच्याबरोबर लग्न केल्याची अफवा असो किंवा निर्माते बोनी कपूर यांच्याबरोबरही अफेअर आणि नंतर विवाह यामुळे त्यांचं आयुष्य वादग्रस्त राहिलं. पण तुम्हाला माहितीये का ? श्रीदेवी यांच्या आईला त्यांच्या मुलीने दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील सुपरस्टार अभिनेत्याबरोबर लग्न करावं असं वाटायचं. यासाठी त्यांनी दोन अभिनेत्यांना मागणीही घातली होती.