Srikanth film Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर दिसली ‘श्रीकांत’ ची जादू; ओपनिंग-डेला केली 'इतकी' कमाई

Srikanth film Box Office Collection: जाणून घेऊयात ‘श्रीकांत’ या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल...
Srikanth
Srikanthsakal

Srikanth film Box Office Collection: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता राजकुमार रावनं (Rajkummar Rao) त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. राजकुमारच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.अशातच राजकुमारचा श्रीकांत हा चित्रपट काल (10 मे) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातील राजकुमाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तसेच या चित्रपटानं ओपनिंग-डेला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल...

बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या ट्रेंडनुसार,'श्रीकांत' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 2.25 कोटी रुपये कमवले आहेत. या चित्रपटाच्या कमाई वीकेंडला वाढ होईल,असा अंदाज लावला जात आहे.

Srikanth
Srikanth Trailer: राजकुमार रावच्या 'श्रीकांत'चा ट्रेलर अखेर आऊट; प्रेक्षकांसाठी ठरणार पर्वणी

‘श्रीकांत’ चित्रपटाचे कथानक

‘श्रीकांत’ हा चित्रपट नेत्रहीन उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित आहे. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार रावने श्रीकांत बोल्ला यांची मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची प्रेरणादायी कथा आणि राजकुमारच्या दमदार अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

‘श्रीकांत’ची स्टार कास्ट

‘श्रीकांत’ हा चित्रपट जवळपास 40 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. राजकुमार राव व्यतिरिक्त चित्रपटात ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com