Rupali Bhosale’s Shocking Double Role Revealed
esakal
Lapandav Serial Upcoming Twist : स्टार प्रवाहच्या लपंडाव मालिकेला प्रेक्षकांचं पसंतीस उतरली आहे. मालिकेत सखी आणि कान्हाच्या लग्नाची धामधूम सुरु असतानाच दुसरीकडे एक महत्त्वाचं रहस्य सगळ्यांसमोर येणार आहे. सरकार अर्थात तेजस्विनी कामत ज्या व्यक्तीला गुपचूपपणे भेटते ती व्यक्ती नेमकी कोण? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. दरम्यान आता त्या सस्पेन्सचा शेवट झालाय. कारण ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून सरकारची जुळी बहीण असल्याचं दाखवण्यात आलय.