

star pravah marathi medium serial lead
esakal
स्टार प्रवाह वाहिनी सध्या टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर टिकून राहण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करताना दिसतेय. गेल्या महिन्यात वाहिनीने दोन नव्या मालिकांची घोषणा केली होती. या मालिका १ आणि १५ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र आता २९ मे रोजी वाहिनीने एक दोन नाही तर तब्बल ८ नव्या मालिकांची घोषणा केलीये, ज्यात २ कथाबाह्य कार्यक्रम आहेत. त्यामुळे आता कोणत्या मालिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र एका मालिकेचा प्रोमो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याचं कारण म्हणजे या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून रील स्टारला घेण्यात आलंय.