ठरलं! 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचा शेवटचा भाग; जयदीप पोस्ट करत म्हणाला-

Sukha Mhanje Nakki Kay Asta Last Episode: स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' आता काही दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
sukh mhanje nakki kay asta
sukh mhanje nakki kay asta esakal
Updated on

स्टार प्रवाहच्या अनेक मालिकांनी टीआरपी यादीत अव्वल स्थान मिळवलं. गेले ५ वर्ष स्टार प्रवाहच्या मालिका टीआरपी यादीवर राज्य करतायत. टॉप १० मालिकांमध्ये याच वाहिनीच्या मालिका आहेत. आता याच टॉप १० मालिकांमधील काही मालिका सध्या प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका. २०२० मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडले. आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलीये. काही दिवसातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com