Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील लोकप्रिय आणि आघाडीची मालिका म्हणजे ठरलं तर मग. अर्जुन आणि सायलीची गोष्ट असलेली ही मालिका पाहणं प्रेक्षक एन्जॉय करतात. मालिकेत आता महत्त्वाचा ट्विस्ट येणार आहे. तो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत. .मालिकेत सध्या विलासच्या खुनाचा खटला कोर्टात सुरू असलेला पाहायला मिळतोय. विलासच्या खून खटल्यात महिपतने मधुभाऊंना अडकवलं आहे. अर्जुन मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे शोधत असताना त्याच्यासमोर महत्त्वाचा पुरावा हाती लागतो. मालिकेतील नवीन वळण कथानकात महत्त्वाचे बदल घडवणार आहे. .प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की, अर्जुन कोर्टात एका माणसाला हजर करतो. तो कोर्टात हे सिद्ध करतो की हरीशचा मृत्यू झाला असताना हा व्यक्ती हरीशच्या मोबाईलवरून तो जिवंत असल्याचं भासवत मेसेज पाठवत होता. तसंच तो महीपतच्या कंस्ट्रक्शन साईटवर राहत होता हे सुद्धा सिद्ध करतो. अर्जुनने कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांवरून कोर्ट अर्जुनाची महिपतची कसून पोलीस चौकशी करण्याची मागणी मान्य करतं आणि तसे आदेश देतं. हे बघून सायली खूप खुश होते. .मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. "आता मजा येणार, महिपतची चांगलीच जिरवली","अब आया उंट पहाड के नीचे","जेव्हापासून सीरियल चालू झालिये तेव्हा पासून एकच केस चालू आहे म्हणून बोरिंग झालिये सीरियल","करा अजून टाईमपास","कृपया त्या प्रियाचा खोटेपणा उघड करा. तिच्यामुळे मालिका कंटाळवाणी झालीये." अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. .प्रिया आणि महिपतचं कारस्थान उघड होणार का ? मालिकेत आता काय ट्विस्ट येणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.."खरे कलाकार मारले जातायत" सावळ्याची जणू सावली मालिकेतील अभिनेत्याने व्यक्त केली खंत.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.