Sonu Nigam Concert: गायक सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये हायहॉल्टेज ड्रामा! दगडफेक अन् बाटल्या फेकल्या; एक जखमी, नेमकं काय घडलं?
Sonu Nigam Concert Incident: गायक सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये हायहॉल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. दगडफेक अन् बाटल्या फेकल्याची घटना घडली आहे. यामुळे एक जखमी झाला आहे.
गायक सोनू निगम त्याच्या कॉन्सर्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलिकडेच त्याच्या संगीत कार्यक्रमादरम्यान लोक नियंत्रणाबाहेर गेले. त्यांनी सोनू निगमवर दगड आणि बाटल्या फेकल्या. यावर सोनू निगमनेही प्रतिक्रिया दिली आणि लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.