

sunny deol on dharmendra farm
esakal
बॉलिवूडची गेल्या वर्षी अपरिमित हानी झाली. लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने चाहते शोकसागरात बुडाले होते. त्यांच्या कुटुंबियांसाठीही ही गोष्ट पचवणं अवघड होतं. त्यांच्या मोठा मुलगा सनी देओल धर्मेंद्र यांच्या खूप जवळ होता. तो कायमच आपल्या वडिलांबद्दल भरभरून बोलला आहे. आताही सनी अशा ठिकाणी गेलाय जिथे धर्मेंद्र यांच्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत. ज्या ठिकाणी धर्मेंद्र त्यांचा फावला वेळ घालवायला जायचे. आता सनी त्याच ठिकाणी पोहोचला आणि तिथे जाताच तो भावुक झालेला देखील दिसला.