बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख असलेली अभिनेत्री सनी लिओनी हिचा आज वाढदिवस. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे. तसंच तिचे अनेक आयटम साँग सुपरहिट ठरलेत. सनी लिओनीचा जन्म 1981 मध्ये कॅनडाच्या सारानिया ओंटारियो इथं एका पंजाबी शीख कुटुंबात झाला. सनी लिओनीचं खरं नाव करणजीत कौर वोहरा हे आहे. तिने सिनेसृष्टीत येण्यापूर्वी जर्मन बेकरी आणि टॅक्स अँड रिटायरमेंट फर्ममध्ये काम केलं. सनी लिओनीला नर्स व्हायचं होतं. परंतु ते शक्य झालं नाही. परंतु आज सनी सिनेसृष्टीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे.