कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि सुरज चव्हाण यांची बिग बॉसच्या घरात चांगलीच गट्टी जमली होती. अंकिता आणि सुरजच बहिण-भावाच नातं चाहत्यांना फार आवडत होतं. बिग बॉसच्या घरातही सुरज चव्हाण आणि अंकिताचं नातं एकदम मस्त होतं. दरम्यान सुरज चव्हाणचा झापुक झुपूक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्त अंकिता आणि सुरजने झापुक झुपूक गाण्यावर भन्नाट डान्स केलाय.