बिग बॉस फेम सुरज चव्हाण याचा नुकताच 'झापुक झुपूक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. चित्रपटाला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. अनेक चाहते सुरजला सपोर्ट करत आहेत. बिग बॉसच्या घरातील सुरजचे मित्र सुद्धा सुरजला पुर्ण सपोर्ट करताना दिसत आहे. अशातच निकी आणि सुरजने 'झापुक झुपूक' चित्रपटातील 'वाजीव दादा' गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. सोशल मीडियावर त्यांचा डान्स व्हायरल झाला आहे.