

SURAJ CHAVAN
ESAKAL
मराठमोळा रीलस्टार सुरज चव्हाण सुरज चव्हाण याने 'बिग बॉस मराठी ५' चा सीझन गाजवला. त्याने आपल्या वागण्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. बिग बॉस त्याच्याकडे हक्काचं घर नव्हतं. तो त्याच्या बहिणीच्या घरात राहत होता. मात्र बिग बॉस जिंकल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं. तर सुरजने त्या घराला बिग बॉसचं नाव द्यायचं कबूल केलं होतं. त्यानुसार त्यांनी त्याला नांव घर बांधून दिलं. महिन्याभरापूर्वीच सुरजने त्याच्या नव्या घरात प्रवेश केला. आता त्याने त्याच्या घराला दिलेल्या नावाची जोरदार चर्चा रंगलीये.