Suraj Chavan’s Wife’s First Look Goes Viral:
esakal
बिग बॉस मराठीमध्ये विजेता ठरलेला सुरज चव्हाण याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय. सुरजने बिग बॉसच्या घरात आपल्या आपुलकीच्या वागण्यातून आणि उत्तम खेळीतून बिग बॉसची ट्रॉफी घरात आणली. सुरज सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असतो. अशातच आता सुरज एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आला आहे. लवकरच लग्न करणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना त्याने दिली आहे.